लोकसहभागातून विकासाची नांदी, शेतकऱ्यांच्या डोक्यावरून ओझे उतरले
अतिक्रमण हटवून सिरपूर-केरवाडी शिवरस्त्या केला खुला
पालम प्रतिनिधी : पिढ्यान पिढ्यापूर्वीचा शिवरस्ता खुला करण्याचे काम लोकसहभागामुळे सहज शक्य झाले. म्हणून सिरपूर-केरवाडी येथील १०० हून अधिक शेतकऱ्यांच्या डोक्यावरून कृषी अवजारे, खते, बी-बियाणे आदी ओझे उतरले.
दोन गावातील शेकडो शेतकऱ्यांच्या पिढ्या या रस्त्यावरील चिखल तुडवीत गेल्या. पावसाळ्यात तर त्यांच्या फजितीला परिशिमात राहिली नव्हती. एक पाय चुकला तर दुसरा पाय पाण्यात असायचा. मग बैलगाडी अन वाहनांची कल्पनाच करता येत नव्हती. त्यातही अतिक्रमण झाल्याने रस्ता अरुंद झाला होता. त्यातून वाट काढून शेतात वस्ती असलेल्या लोकांना घरी ये-जा करण्यासाठी नाकीनऊ यायचे. म्हणून त्यांच्यासह रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या शेतकरी एकत्र आले. त्यांनी पालम तहसीलदारांकडे रस्ता खुला करून देण्याची मागणी केली. त्यात महसूल तरतुदीचा वापर करण्यात आला. प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. पुढे शेतकऱ्यांच्या सहमतीने करून मोजमाप करून दोन्ही बाजूच्या हद्दी निश्चित केल्या. लागलीच विलंब न करता जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या कामालाही सुरुवात केली. आगामी चार दिवसात रस्त्याची संपूर्ण काम होईल. तदनंतर प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या शेतापर्यंत मोटरसायकलसह चारचाकी वाहने पावसाळ्यातही नेता येतील. शेतमाल, कृषी निविष्ठा, शेतोपयोगी अवजारे पावसाळ्यातही डोक्यावर वाहण्याची गरज नाही. आता शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा कायमचा प्रश्न सुटला.
.........
रस्त्याचे उद्घाटन
पालम तहसीलचे नायब तहसीलदार आर.एन. पवळे यांच्या उपस्थितीत सदर रस्त्याचे उद्घाटन युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड राहुल हत्तीअंबीरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रासपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबसाहेब ऐंगडे, मंडळ अधिकारी राजकुमार चिकटे, तलाठी रमेश बनसोडे, अभिलेखापाल ए.बी.पठाण, सरपंच भास्कर लांडे, ग्रा. प. सदस्य राहुल आवरगंड, माजी सरपंच भाऊराव लांडे, देवराव लांडे, देवराव बचाटे, भानुदास बचाटे, मधुकर शेवटे, गंगाधर शेवटे, मारुती लांडे, श्रीनिवास लांडे, शिवाजी दुधाटे, शिवराज शेवटे, शेषराव थिटे, नारायण बचाटे, मुंजाजी बचाटे यांच्यासह आदी उपस्थित होते.
.........
शिवरस्ते आणि पानंद रस्ते अतिक्रमित असून शेतकऱ्यांना अनंत अडचणी सहन कराव्या लागत आहेत. अशा शेतकऱ्यांनी रस्त्याची मागणी महसूल प्रशासनाकडे करावी. तदनंतर पंचनामा करून अतिक्रमणाची खात्री केली जाईल. पुढे रीतसर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून अतिक्रमित रस्ते खुले करून देता येतील. म्हणून शेतकऱ्यांनी संकोच न बाळगता प्रशासनाकडे धाव घ्यावी.
- आर.एन. पवळे, नायब तहसीलदार, पालम.
.....
फोटोओळी : सिरपूर-केरवाडी शिवरस्त्याच्या कामाचे उद्घाटन करताना युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड राहुल हत्तीअंबीरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी राजकुमार चिकटे, तलाठी रमेश बनसोडे, आरेखक पठाण, सरपंच भास्कर लांडे, ग्रा. प. सदस्य राहुल आवरगंड, माजी सरपंच भाऊराव लांडे, देवराव लांडे, देवराव बचाटे
0 टिप्पण्या