पी ए टी एम फाउंडेशन च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पी ए टी एम फाउंडेशन च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 
 लातूर प्रतिनिधी अहमद तांबोळी :- लातूरमध्ये एम के फंक्शन हॉल साठ फूट रोड येथे पटवेकर आतार तांबोळी मनियार फाउंडेशन च्या वतीने मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला हे कार्यक्रम सुरू करण्या पूर्वी पवित्र ग्रंथ कुरान चे वाचन करण्यात आले हा सत्कार विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी होता विद्यार्थ्यांचा मनोबल वाढविण्यासाठी वरिष्ठ नागरिकांनी मार्गदर्शन केले मार्गदर्शन करताना वरिष्ठ नागरिकांनी पुढे चालून आपण खूप चांगले शिक्षण घ्या व खूप चांगली प्रगती करावा
 आपण खूप मोठे अधिकारी व्हा मात्रआई वडिलांना कधी विसरू नका कदाचित आज जे गुण तुम्हाला भेटलेले आहे यामागे तुमच्या आई-वडिलांचा खूप संघर्ष आहे या प्रकारची भूमिका वरिष्ठ नागरिकांनी मांडली विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये आम्ही कधीही सहभागी होऊ या प्रकारची भूमिका स्टेजवरील वरिष्ठ समाजसेवक यांनी मांडली या कार्यक्रमांमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी मौलाना मुफ्ती अब्दुल गणी, अब्दुल हाफिज खतिम यांनी कुराण पठण केले. रहमान गफार सय्यद, सादिया रसूल मणियार या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले. 
पारंबी कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. मोईनुद्दीन मणियार यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. मंचावर प्रमुख उपस्थिती असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजा मणियार यांनी विद्यार्थ्याला येणाऱ्या अडचणीला सोडवण्याचे बोलून भविष्यात कधीही गरज भासल्यास आवश्यक ती मदत केली जाईल बोलून गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंचावर  शफयोदिन पटवेकर, नईमभाई अतार, ताहेर सौदागर(tm) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदर फाउंडेशन चे सहसचिव शदाबभाई पटवेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक गालिब शेख व रशीद कासार यांनी केले तर आभार प्रदर्शन सदर फाउंडेशनचे अध्यक्ष सरफराज(बाबा) मणियार यांनी आभार मानले.खाजा मणियार, जफरभाई पटवेकर, हबीब मणियार, Adv. आबिद मणियार, गफार(सर) सय्यद, फारुख तांबोळी, Adv.कलीम मणियार, सुनील सिरसाट, पत्रकार- के वाय पटवेकर अदिने परिश्रम घेतले.स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानंतर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये विविध विषयावरती विचार मंथन करण्यात आले. फाउंडेशनची पुढील दिशा ठरवण्यात आली या बैठकीला सदर फाउंडेशनचे मुख्य कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसह समदभाई पटवेकर, अन्वर मणियार, महबूब तांबोळी, गफार पटवेकर, Adv. रिहाना तांबोळी, अफसर सय्यद, इसाक पटवेकर, सय्यद अलीम, सलाउद्दीन मनियार, जावेद मणियार, सादिक चौधरी, तबरेज तांबोळी, अहमद तांबोळी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या