शेतकऱ्यांचे तांदूळवाडी प्रकल्पात जलसमाधी आंदोलन,पाणी उपसा परवाने रद्द करण्याची मागणी.
पालक प्रतिनिधी :- डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी तांदूळवाडी येथील लघु प्रकल्प जलाशयात सोमवारी जलसमाधी आंदोलन केले. सदर आंदोलनात परिसरातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी भाग घेतला.
जायकवाडी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना परवाने दिल्याने मोठ्या प्रमाणात जलाशयातून पाणी उपसा होऊ लागला. शिवाय, विरोध असतानाही डोंगरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातून
पाईपलाईन नेण्यात आल्या. त्यासाठी जलसाठा उपलब्ध असल्याचे खोटे प्रमाणपत्र रद्द करावे, यापुढे शेतकऱ्यांना पाणी उपसाचा परवाना देऊ नये, परवाना देण्यासाठी घेतलेल्या बनावट कागदपत्राची चौकशी करावी, आधी मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. दरम्यान शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केल्या. दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांना जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्र आंदोलकांनी घेतला. मग अभियंत्यांनी लेखी आश्वासन आंदोलन मागे घेण्यात आले. आत्माराम सोडनर, प्रभाकर गुट्टे, मारुती पवार, बालाजी गुट्टे, सर्जेराव गुट्टे,परसराम गुट्टे,बाजीराव गुट्टे, बाबुराव गुट्टे ,ज्ञानदेव गुट्टे, माधव सोडनर,नागनाथ देवकते
आदींनी आंदोलनात भाग घेतला. पालम ठाण्याचे फौजदार गणेश सवंडकर यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
0 टिप्पण्या