पालम तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक मानधनाच्या प्रतीक्षेत, वरीष्ठाकडू मानधनाच्या बाबत दुर्लक्ष,

 पालम तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक मानधनाच्या प्रतीक्षेत, वरीष्ठाकडू मानधनाच्या बाबत दुर्लक्ष, 


पालम प्रतिनिधी  :- पालम तालुक्यातील सर्व ग्रामीण भागात ग्रामरोजगार हमीचे कामे चालू आहेत, आयडी पासवर्ड मिळाल्या मुळे,सर्व कामे वेळेवर होत असल्याने, लाभार्थ्याचे समाधान होत असल्याने गाव पातळीवरील, ग्राम रोजगार सेवकाचा तान तनाव कमी झाला,



परंतु कार्यालयाकडून मानधन प्राप्ती साठी मात्र, रोजगार सेवक चिंतेच्या संभ्रमात पडला आहे. मागील बऱ्याच महिण्यापासून मानधन मिळाले नसल्याने, ग्रामरोजगार सेवकाच्या कुटूबावर उपासमारीची वेळ आली आहे. 




कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा मानधना विषयी चर्चा केली असता, मनधनाची मागणी केली आहे, प्रकरण पाठवले आहे, आल्यावर तर मिळणारच आहे,असे चलवाचलवीची उतरे दिल्या जातात.


या सर्व प्रकाराला प्रती उतर म्हणून, पालम तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक, उपोषणाचे पाऊल उचलण्याची गुप्त चर्चा होत आहे, तात्काळ मानधनाच्या बाबत निर्णय घेऊन, ताबडतोब मानधन आदा करावे, असे प्रतीनिधीशी बोलताना ग्रामरोजगार सेवकांनी मत व्यक्त केले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या