पेठपिंपळगाव येथे मोहरम उत्सवात किरकोळ कारणावरुन डोक्यात दगड घालून युवकाचा खून.एक महिला व पुरुष आरोपी आता आड.

 पेठपिंपळगाव येथे मोहरम उत्सवात किरकोळ कारणावरुन डोक्यात दगड घालून युवकाचा खून.एक महिला व पुरुष आरोपी आता आड.


घटना स्थळाला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट                            


पालम :- तालुक्यातील मौजे पेठपिंपळगाव येथे काल दिनांक 17 जुलै  रोजी रात्री 10:30 वाजेदरम्यान मोहरम उत्सवात झालेल्या किरकोळ वादातून युवकाचा खुन झाला आहे.येथीलच रहिवासी असलेल्या शिवाजी ढेंबरे यांचेशी आरोपी सुदाम कांबळे हे विनाकारण हूज्जत घालून वाद निर्माण करत होते तेव्हा फिर्यादी ने तुम्ही माझ्या सोबत विनाकारण हूज्जत घालून वाद कशाला करत आहेत असे बोलताच सुदाम कांबळे यांनी शिवाजी ढेंबरे यांच्या हातात असलेली बॅटरी हिसकावून ती शिवाजी ढेंबरे यांच्या डोक्यात मारली. बाजूलाच उभे असलेले फिर्यादी यांचे आतेभाऊ रुस्तुम गोविंदराव शिंदे हे जवळ जाऊन कशाला विनाकारण मारहाण केली असे बोलले ,तेव्हा सुदाम कांबळे, सचिन कांबळे ,विजय कांबळे, बाबासाहेब कांबळे, अनिता कांबळे, सलोनी कांबळे, चांगोबाई कांबळे, सुरेश मोडके यांनी संबंधित जाब विचारणारे रुस्तुम शिंदे यांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली व त्यांच्या राहते घरापर्यंत ओढत नेले. तेव्हा मारहाण करत असलेल्या महिलांनी मिरची पावडर डोळ्यांमध्ये टाकून दिली तर सचिन कांबळे यांनी घरावरील पत्र्यावर असलेला दगडी चिरा उचलून जीवे मारण्याचे उद्देशाने रुस्तुम शिंदे यांच्या डोक्यावर टाकला या दगडाच्या मारात रुस्तुम शिंदे जागीच ठार झाले. शिवाजी ढेंबरे यांनी पालम पोलिस ठाण्यात रितसर लेखी तक्रार दाखल केली, त्यावरून भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 103(1)  118(1) 115(2) 189(2) 189(3) 191(2) 190  नुसार वरिष्ठ अधिकारी यांचे आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला. दोन महिला आरोपी व एक पुरुष आरोपींना ताब्यात घेतले असून  पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंडे हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या