शेतकरी संघटनेच्या वतीने देवणी येथे रस्ता रोको आंदोलन.
शेतकरी संघटनेच्या वतीने देवणी येथे आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा व्याज परतावा मिळावा., पिक विमा 3वर्षा पासून चां मिळावा आठ तास दिवसा लाईटमिळावे व, सीएससी सेंटरवर विमा भरण्यासाठी अनधिकृत पणे दोनशे रुपये आकारले जात आहे, तो थांबावे व खतांचा तुटवडा आहे ते सुरळीत करून शेतकऱ्याला खत मिळावे व चढ्या भावाने देऊ नये अन्यथा त्यांच्यावरती कारवाई करावी असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे .
या आंदोलनास शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र काशिनाथ अंबुलगे, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मिथुन दिवे ,लातूर जिल्हा अध्यक्ष गजानन बोळंगे, जील्हा कार्याध्यक्ष संजय देवप्पा,देवणी तालुकाध्यक्ष विकास नमनगे व योगेश तगरखेडे श्रीमंत अण्णा लुल्ले करीम भाई शेख चेतन मिटकरी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांना नम्र विनंती आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी या आंदोलनामध्ये उपस्थित राहून सहकार्य करावे व परिसरातील सर्व शेतकरी बांधव या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही शेतकरी संघटनेच्या वतीने नम्र विनंती.
0 टिप्पण्या