पुण्यश्र्लोक राजमाता अहिल्याबाईं होळकर या कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम होत्या. पराक्रम,प्रशासन आणि प्रजाहितवादी कार्याची सांगड घालून त्यांनी आदर्श शासक म्हणुन लौकिक प्राप्त केला.त्यानी केलेले न्यायिक व सामाजिक कार्य आजही प्रेरणादायी आहे पुण्यश्र्लोक अहिल्याबाईं होळकर यांची आज जयंती पुण्यश्र्लोक राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकरांनी तीन शतकापुर्वी पतीसोबत सती जाण्यास नकार देत स्वतः हा पासुन अनिष्ट प्रथांना मुठमाती देण्यास सुरुवात केली व पुढे त्यांनी असे अनेक निर्णय अमलात आणले, एक स्त्री काय करू शकते याचा आदर्श निर्माण करणारी महाराणी -स्वत हाच्या ताकदीवर २८ वर्ष राज्य सांभाळणारी सर्वात प्रथम स्त्रियांना लष्करी प्रशिक्षण देणारी पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर कुलभुषण ,राजकारण,धुरंधर,महें श्र्वरची महाश्र्वेता ,प्रजाहिता करणी, देवी अश्या अनेक पदव्या मिळवलेली जगात एकमेव स्त्री ,कुशल संघटक लोकमाता खऱ्या प्रथांने भारताची पायाभरणी करणाऱ्या पुण्यश्र्लोक अहिल्यादेवीना २९९ वी जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन व विनम्र अभिवादन, अहिल्यादेवी एक चाणाक्ष ,सुधारणावादी राज्यकर्त्या ,कुशल समाज सेविका ,पराक्रमी योद्धा,दया,पराक्रम, निष्ठा या भावनांनी ओतप्रोत भरलेले अंतकरण असणाऱ्या व मनगटात ताकद त्यांच्या तलवारीत आग होती इंग्रजांनाही दाद न देण्याची जिद्यच त्यांची न्यारी होती,राणी असुनही वेगळी जिची छाप होती,अशी राणी अहिल्यामाई राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्याच्यां चरणी पुन्हा एकदा अभिवादन🙏💐 व सर्वाना अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा, 💐
आपली स्नेहांकित
उषा पानसरे नारी अत्याचार निवारण केद्र प्रदेश सचिव असदपूर
0 टिप्पण्या