प्रज्ञाशोध परीक्षेत फिनीक्स इंग्लिश स्कूल पाथरूड शाळेची धमाकेदार कामगिरी.

 प्रज्ञाशोध परीक्षेत फिनीक्स इंग्लिश स्कूल पाथरूड शाळेची धमाकेदार कामगिरी.



भुम प्रतिनिधी :- प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून परीक्षांमध्ये फिनिक्स इंग्लिश स्कूल पाथरूड तालुका भूम येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.यामध्ये इयत्ता चौथी - मध्ये ध्रुविका बोराडे 240 गुण जिल्ह्यातून नववी ,इयत्ता दुसरी -शिव बोराडे १७० गुण जिल्ह्यातून आठवा, शिवदीप बोराडे व स्वराज साळुंखे 168 गुण जिल्ह्यातून दहावा , श्रेया शेजाळ 160 गुण तालुक्यातून चौथी , इयत्ता पहिली -

सार्थक भोसले व सत्यजित वाघ 172 गुण जिल्ह्यातून आठवे ,राजनंदिनी पिंपळे 162 गुण तालुक्यातून दुसरी , मयूर मयुरी चकोर 158 गुण तालुक्यातून चौथी, करण तिकटे व आरव वनवे 156 गुण तालुक्यातून पाचवे वरील विद्यार्थ्यांनी जिल्हा व तालुक्यात तालुक्यामध्ये घवघवीत यश मिळवले.तसेच परीक्षेत बसलेले 40 विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.हे यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे मुख्याध्यापक खांडेकर बापू , वैशाली टाळके , भाग्यश्री कांबळे ,  अर्चना खुणे, स्वप्नाली टाळके , सोनाली खुणे , करडे लता ,पुनम बोराडे , प्रिती पन्हाळे, कांबळे दिपाली या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . विशेषत: म्हणजे वर्गशिक्षकांनी व पालकांनी खुप मेहनत घेतली यामुळे मुलांचे नावे गुणवत्ता यादित आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या