रमज़ान परिचय व रोज़ा इफ़्तार कार्यक्रमाचे आयोजन
सर्व धर्मातील बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
बीड प्रतिनिधी :- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात रमज़ान परिचय व रोज़ा इफ़्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक ५ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ०५:३० वाजता आयोजित करण्यात आला असून महिलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
पवित्र रमज़ान महिन्याच्या शुभ मुहूर्तावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने बीड शहरातील दोन्ही समाजातर्फे रोज़ा इफ़्तार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये सर्व समाजातील लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध इस्लामी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या सदिच्छा विभागाचे सचिव डॉ. सय्यद रफिक पारनेरकर यांचे रमज़ान परिचय या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. ज्यामध्ये रमज़ान, उपवासाचा उद्देश, क़ुरआनचा संदेश मराठी भाषेतील महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे. व्याख्यानानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या मैदानात रोज़ा इफ़्तार कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व समाजातील बंधू-भगिनींनी आपला मौल्यवान वेळ काढून या विशेष कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड, सावित्री-फातेमा सद्भावना मंच जमाअत ए इस्लामी हिंद बीड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मित्र मंडळ बीडकडून करण्यात आले असून महिलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या