धाराशिव येथील घटनेच्या निषेधार्थ आरोपींवर तात्काळ कडक कारवाई करा:-व्हॉइस ऑफ मीडिया भूम च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
धाराशिव प्रतिनिधी :- जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त रवि केसकर यांचे अपहरण करुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणाचा जाहिर निषेध, प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कडक कार्यवाहि करण्यात यावी यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया भूम च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त रवि केसकर यांचे अपहरण करुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्यांचे वाहन हल्लेखोरांनी नेवून तुळजापूर रोडवर वडगांव शिवारात अडगळीला टाकून नुकसान केली. हल्लेखोरांची वाढती गुंडगिरी पाहता समाजाभिमुख लेखी धोक्यात येत आहे. वृत्तांकन करणे धोक्याचे झाले आहे. या हल्याप्रकरणाचा भूम तालुका व्हाईस ऑफ मिडियाच्यावतीने जाहिर निषेध करुन विनंती करतोत की, या हल्ला प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कड़क कार्यवाहि करावी. पत्रकार संरक्षण कायदयाची या प्रकरणात अंमलबजावणी करावी अन्यथा यापुढील काळात असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. यापुढे तिव्र आंदोलन केले जाईल याची दखल घेण्याची घेण्यात यावी.निवेदन देण्यासाठी संतोष वीर, रवींद्र लोमटे,चंद्रमणी गायकवाड,तानाजी सुपेकर, प्रदीप साठे,आबासाहेब मस्कर,रोहित चंदनशिवे,शंकर खामकर,औदुंबर जाधव,सुनील कुमार डुंगरवाल , नवनाथ यादव, महावीर बनसोडे आदींची उपस्थिती असून निवेदनावर सह्या आहेत.
0 टिप्पण्या