जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती महोत्सव : प्रभावती नगरी गौरव सेवा रत्न पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

 जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती महोत्सव : प्रभावती नगरी गौरव सेवा रत्न पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न





परभणी प्रतिनिधी

स्व. छगन आप्पा जाधव गोसंवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट प्रणीत, गौरक्षक सेना परभणी संचलित वीर वारकरी सेवा संघ – राष्ट्र जन फाउंडेशन, परभणी यांच्या वतीने



राष्ट्र राजमाता जिजाऊ मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भव्य-दिव्य धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दिनांक : 12 जानेवारी 2026

स्थळ : भगवा चौक, रामकृष्ण नगर, वार्ड क्र. 15, परभणी

 कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये

श्री विष्णुसहस्त्रनाम पारायण

हनुमान चालीसा पठण

व्याख्यान व प्रवचन

प्रभावती नगरी गौरव सेवा रत्न पुरस्कार वितरण

हा भव्य सोहळा गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या पुढाकारातून यशस्वीपणे पार पडला.

 प्रमुख मान्यवर

उद्घाटक : उद्योजक पवनभाऊ निकम

पुरस्कार वितरण : गो-कथाकार ह.भ.प. संदीप भाईजी महाराज शर्मा

अध्यक्ष : ह.भ.प. बालासाहेब महाराज मोहिते पाटील

स्वागताध्यक्ष : डॉ. गोविंद कामठे (आयुर्वेदिक नाडी तज्ज्ञ)

संयोजक व सूत्रसंचालन : संभाजी शेवटे सर

 प्रभावती नगरी गौरव पुरस्कारार्थी

महंत स्वामी अद्वैत चैतन्यजी महाराज – वारकरी भूषण सेवा रत्न

ह.भ.प. शेषराव महाराज सोपने – आध्यात्मिक भूषण सेवा रत्न

ऋतुराज भक्तराज भोसले पाटील – उत्कृष्ट मृदंग-पखवाज वादन

उत्तमराव लोखंडे – पारायण सेवा रत्न

सुकेशिनीताई चौधरी – जिजाऊ सेवा रत्न

डॉ. अनिल कुलकर्णी नाथरेकर – आयुर्वेदिक सेवा रत्न

राम जाधव सर – शिक्षक सेवा रत्न

संतोष चौधरी – उद्योजक सेवा रत्न

कलाकार शेख अफसर शेख (सालार पिंजारी) – लोकनाट्य कला

विनोद अण्णा भोसले – समाज प्रबोधन

गोपालक काका महाराज कदम – कामधेनु गोसेवा

भागवत मगर – कृषी सेवा

देवानंद लिंबाळकर – सर्पमित्र सेवा

ज्ञानेश्वरी भजनी मंडळ, शिवराम नगर – उत्कृष्ट भजनी मंडळ

सर्व पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व वारकरी टोपी देऊन गौरविण्यात आले.

प्रेरणादायी संदेश

अध्यक्षीय भाषणात ह.भ.प. बालासाहेब महाराज मोहिते पाटील यांनी सामाजिक ऐक्य, वारकरी परंपरा व तळागाळातील सेवकांना प्रोत्साहन देणाऱ्या या चळवळीचे कौतुक केले.

तर ह.भ.प. संदीप भाईजी महाराज शर्मा यांनी गोसेवा, अध्यात्म व समाजएकतेचा संदेश दिला.

 समारोप

आरती, पसायदान व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

गेल्या १४ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला हा १५ वा भव्य महोत्सव समाजाला दिशा देणारा ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

ही माहिती वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकारांमार्फत दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या