हरिपाठाचे वाचन म्हणजे इश्वरीय ज्ञान संजीवनी आहे वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर
परभणी प्रतिनिधी :- वीर वारकरी सेवा संघ परभणीच्या वतीने चक्रवृती कैवल्य सम्राट,अलंकापुरी निवासी, संतश्रेष्ठ संतशिरोमणी, संतश्रेष्ठ, श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्ताने,त्रिवार वंदन व पूजन करून,ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे,दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी,रामकृष्ण नगर येथे, वार्षिक ज्ञानेश्वरी पारायण वाचक सोहळा व नवीन पारायण वाचन प्रारंभ,प्रत्येकाने आपापल्या घरी,ज्ञानेश्वरीचे वाचन किंवा, दररोज नित्यनेमाने,श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या,हरिपाठाचे वाचन व पठण प्रत्येकाने करणे काळाची व आपल्या सुख,शांती व समाधानासाठी गरजेचे आहे, वारकरी संप्रदायात प्रत्येक नागरिकांसाठी हरी पाठाचे वाचन हे जीवनाचा सार आहे,हरीपाठ किर्ती मुखे जरी गाय,पवित्रची होय देह त्याचा,यासाठी,हरिपाठ वाचन केलं पाहिजे, ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा व पदयात्रा केल्याच पुण्य,हरिपाठ म्हटल्याने प्राप्त होते,असे सात्विक,वीर वारकरी सेवा संघ परभणी,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,ज्ञानेश्वरी वाचक,नितीन जाधव गोगलगावकर यांनी प्रबोधन केले आहे,



0 टिप्पण्या