खुलताबाद गटविकास अधिकाऱ्यांवर तहसीलदारां यांनी कली शिस्त भंगाची कारवाई, आधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

खुलताबाद गटविकास अधिकाऱ्यांवर तहसीलदारां यांनी कली शिस्त भंगाची कारवाई, आधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.

मुनीर शाह बाजार सावंगी प्रतिनधी :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद पंचायत समिती शासकीय योजनेतील घोटाळ्यातील बनली चर्चेचा विषय,मा.तहसीलदार स्वरूप कंकाळ साहेब यांनी दोन स्मरणपत्रे देवूनही तक्रारीनुसार  माहिती दिली नसल्याने तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी थेट सीईओंना,पत्र लिहून गटविकास अधिकारी विस्तार आधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केल्याने अधिकाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.



विष्णु उत्तम चव्हाण व ईतर ६ नाारीक रा.गदाना यांनी, खुलताबाद तहसील कार्यालयात १ जानेवारी रोजी, पंचायत समिती कार्यालय खुलताबाद येथील मग्रारोहयो विभागात २०२२ ते २०२४ या कालावधीत सिंचन विहिरी व जनावरांच्या गोठ्याचे व पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विविध प्ररकारच्या शासनाच्या योजना प्रलंबित ठेवलेल्या बाबत विचारणा केली असता,ज्या लाभार्थ्यांनी किंवा तक्रारदारांनी या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत आर्थिक देवाणघेवाण केले नाही तर ते खुलताबाद पोलिसांना बोलवून घेतात व खुलताबाद पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक.व पोलीस कर्मचारी कुठल्याही प्रकारची चौकशी अथवा शहानिशा न करता एकतर्फी जवाब  घेऊन खोटा गुन्हा दाखल करतात.व क्रॉस कंप्लेंट न घेता क्रॉस कंप्लेंट. तक्रारदारास तासंतास बसवून ठेवतात.

यावरून असे स्पष्ट दिसते की खुलताबाद पोलीस ठाणे व पंचायत समिती यांची युती असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे तक्रारदारावर.व क्रॉस कंप्लेंट करणाऱ्या वर किंवा लाभार्थ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात,अशा स्वरुपाची तक्रार करत सदर प्रकरणात चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार तहसीलदार,स्वरूप कंकाळ यांनी,पत्र क्रमांक १ तसेच स्मरणपत्र १ व स्मरणपत्र २ देऊन ग्रामपंचायतनिहाय कामाची यादी,तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, कार्यारंभआदेश दिनांकासहीत माहिती कळविण्या साठी गटविकास अधिकाऱ्यांना सांगितले होते. याबाबत दोन वेळा स्मरणपत्र देऊनही,माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने.तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी थेट जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ११ फेब्रुवारी रोजी पत्र देऊन याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी व संबंधित कर्मचारी त्यांच्यावर,शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केल्याने.तहसीलदारांनी घेतलेल्या या निर्णयाने सर्वसामन्यांतून त्यांचे कौतूक होत आहे,तर  या पत्राने प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे.तहसीलदारांच्या या भुमिकेनंतर सीईओ आता कोणती भूमिका घेतात,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या