ताई-बाई-अक्का... अवघे ३६ तास.....? प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस; उमेदवारांसह कार्यकर्त्यांची दमछाक.......

 ताई-बाई-अक्का... अवघे ३६ तास.....? प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस; उमेदवारांसह कार्यकर्त्यांची दमछाक....... 



मुनीर शाह बाजार सावंगी./खुलताबाद प्रतिनिधी :- खुलताबाद गंगापुर विधानसभा निवडणुकीचेचित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. उमेदवारांना प्रचारासाठी केवळ आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे रात्रीचा दिवस करून प्रचार जोरदार सुरु आहे. एका गावात दोन दोन वेळा गाठीभेटी घेऊन मतदाराना मलाच मतदान करा अशा विनवण्या सुरू आहेत. खुुलताबाा.मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला जोरदार सुरुवात झाली होती. त्यातच सध्या प्रचार शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. शहरातील प्रत्येक प्रभाग तर ग्रामीण भागातीलमतदारसंघातील प्रत्येक गाव, वस्ती, तांडा आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यास उमेदवार आपली कसरत करण्यास सोडत नाहीत. त्यामुळे उमेदवार व त्यांच्या समर्थकांना रात्रीचा दिवस करावा लागणार आहे. त्यामुळे हा काळ महत्त्वपूर्ण आहे. दरम्यान २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार

आहेत. त्यामुळे १६ ते १८ नोव्हेंबर असे केवळ २ दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. कार्यकर्त्यांना रात्रीचा दिवस करून प्रचार करावा लागेल. प्रमुख उमेदवारांनी यापूर्वीच आपला प्रचार सुरू केला आहे. बहुतेक उमेदवारांच्या प्रचाराच्या बऱ्याच फेऱ्यादेखील झाल्या आहेत.

प्रचार रॅली व गृहभेटींवर भर

प्रचारासाठी आता दिवस कमी असल्याने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला कंबर कसली

आहे. प्रचार रॅलीसोबतच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून

गहभेटींवरही भर दिला जात आहे. प्रस्थापित उमेदवार


केलेल्या कामांची यादी मतदारांसमोर मांडत आहेत तर नवीन उमेदवार निवडून आल्यास पाच वर्षात कोणती कामे करणार, कोणत्या कामांना प्राधान्य देणार, याचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडत आहेत. तसेच उमेदवारांना आता कसून प्रचार करावा लागत आहे. प्रचारासाठी राहिलेला कमी कालावधी आणि निवडणुकीत निर्माण झालेली चुरस लक्षात घेता राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचा कस लागत आहे. आपल्याकडून कोणतीच कसर राहता कामा नये याची प्रत्येक उमेदवार दखल घेत आहे.


मात्र, ग्रामीण भागात कापसाचा हंगाम सुरू झाला आहे. कापूस वेचणीला सुरुवात झाली


आहे. तसेच कांदा लागवड व इतर शेतीची कामे जोरात सुरु आहेत. त्यामुळे उमेदवारांना खेडे गावात जाऊन सकाळी लवकर पोहचत आहे. त्यामुळे कोणताच उमेदवार आपली शेवटच्या दिवसांपर्यंत सगळ्यांच्या कशा गाठी भेटी घेता येतील यावर लक्ष केंद्रित केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या