हायटेक इंग्लिश स्कूल शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न
उमरगा तालुका प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील हायटेक इंग्लिश स्कूल शाळेचा ६वा वार्षिक स्नेहसंमेलन दि. ०६व ०७ मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला असून यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी महाराष्ट्रीयन लोककलेचे सादरीकरण करून येणेगुरकरांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात नटराज प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक लातूर व रघुवंश पब्लिक स्कूल लातूर संस्थापक अध्यक्ष एस.आर.वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुरूम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गाडेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षक संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष विलास कंटेकुरे, येणे गुरचे सरपंच रेखाताई गुंजोटे, विवेक वर्धनीय सामाजिक संस्था उमरगा चे अध्यक्ष सुकुमारबाई जकेकुरे, महालिंगरायवाडीचे सरपंच विजयाबाई माने, येणेगुर फेस्टिवलचे संयोजक प्रदीप मदने, उद्योजक अनिल संगशेट्टी, शिवअण्णा जकेकुरे, पत्रकार संभाजी पाटील, शरद गायकवाड, निजगुण स्वामी, मोहन गुरव, योगेश पांचाळ, हायटेक इंग्लिश स्कूलचे संस्थापक लक्ष्मण जकेकुरे, प्रकाश कंटेकुरे, स्कूलच्या मुख्याध्यापिका सरस्वती मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नर्सरी तेआठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी धर्मिक गीते , कोळीगीते, शेतकरी गीते, देशभक्ती गीते, रामायण, बालगीते, मराठी, हिंदी रीमिक्स गीते, लावणी असे विविध गीतावर नृत्य सादरीकरण करून ग्रामस्थांचे मनोरंजन केले.
रामायण गीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले, यावेळी गावकऱ्यांनी आपल्या चिमुकल्यांचे कौतुक करून बक्षिसांचा वर्षाव केला,
या सुंदर अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित रेड्डी, श्रुती गायकवाड ,श्रेया घोरपडे, यांनी केले तर आभार दिलीप ढोबळे व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्कूलच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख स्मिता पोतदार, शिक्षक राजेंद्र कुमार ,योगेश कांबळे ,महादेव मंगरूळे ,इराप्पा मंडले, एस.एस. इगवे ,प्रतिभा पांचाळ, राधिका म्हणले ,प्रतिभा कांबळे, वर्षा सोलापुरे, अलका हिंगमिरे, संध्या सगर ,राणी कांबळे ,गौरी जामगे,मयुरी देशमुख ,दिनेश पाटील, यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचा समारोप "वंदे मातरम" या राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक वर्ग, पत्रकार बांधव, तसेच येणेगुर व परिसरातील ग्रामस्थ ,रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 टिप्पण्या