ग्रामीण भागात रुरल चेंबर ऑफ कॉमर्स इंडिया या संस्थेच्या निमित्ताने पेठ पिंपळगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन.

 ग्रामीण भागात रुरल चेंबर ऑफ कॉमर्स इंडिया या संस्थेच्या निमित्ताने पेठ पिंपळगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन.



ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे उद्योग उभे करा :- अतुलजी घुईखेडकर .



पेठ पिंपळगाव प्रतिनिधी :- पेठ पिंपळगाव येथे दिनांक 27/ 2/ 2024 रोजी कृष्णाजी भोसले ऍग्रो पेठ पिंपळगाव या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अतुलजी घुईखेडकर   राष्ट्रीय अध्यक्ष, संजय राव देशमुख राज्य समन्वय, तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाऊसाहेब भोसले, उपस्थित होते या रुरल चेंबर ऑफ कॉमर्स इंडिया या मध्ये प्रा, अनंतराव शिंदे जिल्हा अध्यक्ष,व कृष्णा भोसले युवा उद्योजक यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली,

या कार्यक्रमाची  दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली यावेळी  आलेल्या मान्यवराचे शाल,व  श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे आयोजन युवा वर्गातून उद्योग कसा करावा यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते, ग्रामीण भागात उद्योग उभारले जावे व नवे उद्योजक पुढे यावे यासाठी कार्य करणाऱ्या या ,""रुरल चेंबर ऑफ इंडिया"" या संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले असे मार्गदर्शक संघटनेचे अध्यक्ष घुई खेडकर यांनी केले यासाठी मार्केटिंग निर्यात, तंत्रज्ञान, कर्ज उभारणी, ची माहिती दिली ,त्यानंतर,"" रुरल चेंबर ऑफ इंडिया ""च्या पदाधिकारी यांची निवड करण्यात आली शेवटी आभार प्रदर्शन युवा उद्योजक कृष्णा भोसले यांनी केले तर प्रास्ताविक सतीश जाधव सर यांनी केले यावेळी प्रतिष्ठित नागरिक अशोक बापूराव शिंदे, अशोक तातेराव शिंदे बापूसाहेब रुस्तुमराव शिंदे , माजी सरपंच शिवाजी गाणार, सरपंच जिजाराम अनगीलवाड, पत्रकार अवधूत जाधव, अमोल शिंदे राजधर भोसले, नंदकुमार शिंदे   या वेळी चिमुकला साईराज अवधूत जाधव यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले ,गावातील नागरिक व तालुक्यातील परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या