कोविड सेवेतून डॉक्टरांच नशिब उघडलं,टोलेजंग इमारतीच स्वप्न पूर्ण झालं.लातूर येथील डॉक्टर घुगे प्रकरण.
कोविड काळातील सेवेतून उभारले सात मजली टोलेजंग हॉस्पिटल ?
लातूर सोडून सोलापूरला निघालेले डॉक्टर घुगे कशाचे " आयकॉन " ?
सेवेचे, अत्याधुनिक उपचाराचे की अन्य कशाचे ?
इमारत उभारली पण प्रतिमा आणि जनतेतील अविश्वासाचे काय ?
लातूर प्रतिनिधी जावेद शेख :- लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात बोटावर मोजण्याइतके डॉक्टर निश्चित देवदूत आहेत.मात्र बहुतेक डॉक्टर असे आहेत ज्यांचे नाव घेतले की लोक अक्षरशः शिव्याच्या लाखोल्या वाहतात,त्याचे कशाला नाव काढलो लई लुटतय,त्याच्यापेक्षा खाटीक बरा,हरामखोर असे म्हणतात,त्यात डॉक्टर प्रमोद घुगे यांचे नाव पहिल्या पाच मध्ये नक्कीच लोक उघड घेतात.ते डॉक्टर प्रमोद घुगे यांच्यावर उपचारात हलगर्जीपणा केल्याने रुग्ण दगावला असा आरोप 2022 मध्ये झाला, त्यावेळी आपण लातूर सोडून सोलापूरला जातोय अशी भावनिक घोषणा स्वतःच्या फेसबुकवरून केली,मात्र सोलापूरला न जाता त्यांनी लातुरात सात मजली टोलेजंग हॉस्पिटल उभे केले असून रविवारी राजकीय नेते आणि अधिकारी यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उदघाटन होणार आहे.आयकॉन हॉस्पिटल असे नाव दिले असले तरी हे कशाचे आयकॉन आहे ? सेवेचे,उपचाराचे की अन्य कशाचे असा सवाल आता उपस्थित होत असून इमारत उभारली मात्र जनतेत असलेल्या डॉक्टर घुगे यांच्या प्रति अविश्वास आणि घाण प्रतिमेचे काय ? अर्थात लातुरात येऊन भाड्याच्या जागेत हॉस्पिटल असताना शहरातील यशोदा चित्रमंदिर समोर जागा घेऊन ज्याची किंमत करोडोत आहे तेथे सात मजली इमारत ज्यावेळी बांधले जाते त्यावेळी नक्कीच हे सरळ मार्गाने आणि सोपे नाही.यापुढं जाऊन कोविड काळात लातूरच्या जनतेची प्रचंड लूट झाली, तो काळ म्हणजे शहरातील कांही डॉक्टरांसाठी पर्वणीच होती.आणि मग डॉक्टर प्रमोद घुगे यांनी बांधलेले सात मजली हॉस्पिटल हे कोविड काळातील सेवेचे प्रतीक आहे का असा प्रश्न आज सहज पडतो.अर्थात कागदोपत्री मेळ घालून,कर्ज दाखवून मालमत्ता उभ्या करणे हे कांही नवीन नाही,मात्र तथाकथित सेवेतून करोडोची मालमत्ता नक्कीच उभारता येते हे डॉक्टर घुगे यांच्या सात मजली इमारत पाहून प्रत्यय नक्कीच येतो.त्यामुळे डॉक्टर घुगे हे सेवेचे आयकॉन तर नक्कीच होऊ शकत नाहीत,बाकी कशाचे होऊ शकतात हे कांही वेगळे सांगायला नको.अर्थात डॉक्टर घुगे यांच्या मते सेवेची व्याख्या वेगळी असू शकते.
लातूरचे वैद्यकीय क्षेत्र आज फार बदनाम झाले आहे.अर्थात लातूरच्या वैद्यकीय क्षेत्राला सेवेची उज्ज्वल परंपरा असताना आज लुटीचे विक्रम स्थापित होत आहेत हे वास्तव आहे.आणि या डॉक्टरांना असलेला राजकीय वरदहस्त पाहता किंचित देखील नैतिकता या डॉक्टरात राहिली नाही.अगदी लातुरात कोठेही मोक्याच्या आणि वादग्रस्त मालमत्ता विकायला निघाल्या की दलाल लोक पाहिले डॉक्टरला संपर्क करतात,त्याअर्थी किती,कसा आणि कोठून पैसा येत असेल हे कांही वेगळे सांगायला नको.अर्थात नैतिकता आणि अंतर्मन मेलेले असेल तर या गोष्टींना अर्थ उरतो कोठे.आणि हेच लोक ज्यावेळी स्वतःची प्रतिमा ठरवून कितीही समोर आणत असतील, मात्र लोक बोलत नसतील, मात्र वास्तव नक्कीच जाणतात. लातूरची जनता कोविड काळ कधीही विसरणार नाही,आणि त्यातल्या त्यात कांही हॉस्पिटल तर कधीही विसरणार नाही.ज्यात आयकॉन हॉस्पिटल देखील आहे.शिवाय अंबेजोगाई रोडवरील दोन हॉस्पिटल,शासकीय कॉलनी परिसरातील एक हॉस्पिटल,औसा रोडवरील एक हॉस्पिटल हे कायम चर्चेत राहिले तसेच या हॉस्पिटलची अनेक प्रकरणे समोर आली.तर कांही प्रकरणे समोर आलीच नाहीत, सांगायचे कोणाला आणि त्यावेळचा काळ आणि परिस्थिती पाहता अनेकांनी शांत राहणे पसंद केले.अर्थात तो काळ म्हणजे डॉक्टरांसाठी पर्वणीच होती.अगदी नंगानाच डॉक्टरांनी केला.शासकीय नियम तर अक्षरशः धाब्यावर बसवले गेले.अर्थात असलेले राजकीय पाठबळ आणि त्याच जोरावर प्रशासकीय मदत यामुळे जनतेचे अन्याय झालेल्या रुग्णाचे ऐकणार कोण हा सवाल होताच. त्यात आयकॉन हॉस्पिटलचे देखील अनेक प्रकार त्याकाळी समोर आले,सात सात रेमडेसिव्हीर इंजेक्शन लिहून देणे, लाखात बिल वसूल करणे असे अनेक प्रकार लातूरच्या जनतेने अनुभवले. परिणामी आज डॉक्टर घुगे यांची प्रतिमा अत्यंत वाईट लातूरमध्ये आहे.आज डॉक्टर घुगे पत्रकार परिषद घेऊन आणि सोशल मीडियावर आपले उदात्तीकरण करून घेत असतील.मात्र जनतेतील वाईट प्रतिमा आणी अविश्वास फार मोठ्या प्रमाणात आहे हे नाकारता येणार नाही.अगदी नाव घेतले की लोक अक्षरशः शिव्या घालतात हे भीषण वास्तव आहे.डॉक्टर घुगे हे स्वीकारतील असे मुळीच नाही.अर्थात त्यांचा स्वभाव पाहता ते शक्य देखील नाही.आणि त्याच परिणामी अनेक घटना घडल्या,त्यातील कांही पुढे आल्या तर कांही पुढे आल्याच नाहीत.2022 मध्ये एक प्रकार समोर आला,लातूरच्याच एक रुग्णाचा मृत्यू डॉक्टर घुगे यांच्या हलगर्जीपणामुळे गेला असा आरोप नातेवाईकांनी केला,मात्र असलेले राजकीय पाठबळ आणि प्रशासकीय सहकार्य यामुळे घुगे यांच्याविरुद्ध कांहीही कारवाई झालीं नाही.मात्र घुगे यांनी इमोशमल ड्रामा केला.कांही व्हाट्सए ग्रुप चालवणारे ज्यात बहुतेक अधिकारी,डॉक्टर आणि राजकीय नेत्यांचे उदात्तीकरण केले जाते, आणि आपले दुकान चालवले जाते,अश्या तथाकथित पत्रकारांकडून उदात्तीकरण करून घेतले. एवढेच नव्हे तर आपणं कसा उपचार करतो किती सेवा देतो याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमातून प्रसिद्ध केले.आणि हे कांही कमी होते की काय,मी उद्विग्न होऊन लातूर सोडतोय, आणि सोलापूरला जातोय अशी घोषणा 16 सप्टेंबर 2022 ला केली होती. मात्र घुगे हे सोलापूरला तर गेलेच नाहीत,उलट त्यांनी आज टोलेजंग सात मजली हॉस्पिटल उभारले असून जवळपास 100 राजकोय नेते आणि अधिकारी या हॉस्पिटलच्या उद्घाटन साठी येत आहेत,विशेषतः शेजारच्या बीड जिल्ह्यातुन अधिक मान्यवर येत आहेत.अगदी पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर घुगे यांनी लातूरमध्ये कसे उपचार मिळतील याची माहिती दिली.पण जनतेतील अविश्वास आणि प्रतिमा बदलेल अशी मुळीच शक्यता नाही.त्यामुळे आज डॉक्टर घुगे यांनी जरी सात मजली इमारत उभारली असली तरी हे सेवेचे नाही तर लुटीचे प्रतीक आहे असा अर्थ जर कोणी काढला तर नवल वाटायला नको.आणि अर्थात सोलापूरला देखील डॉक्टर घुगे न गेल्याने या संपूर्ण प्रकार पाहता सोलापूरकर मात्र वाचले असा अर्थ नक्कीच काढता येईल.मात्र लातूरच्या जनतेच्या नशिबी तेच कायम राहिले.
लातूरसारखे सेफ ठिकाण सोलापूर आहे कोठे ?
लातूर म्हणजे राजकारणी, अधिकारी, डॉक्टर, खाजगी मास्तर, यांच्यासाठी एक सुरक्षित ठिकाण आहे.म्हणजे येथील जनतेला प्रत्येकाचा अन्याय सहन करण्याची, जाऊ द्या आपल्याला काय करायचे आहे अशी मानसिकता झालेली आहे.त्यामुळे प्रत्येक जण येथे येतो आणि नंगानाच करून जातो,तर कांहीजण येथेच स्थायिक होतात.विशेषतः गुन्हेगारी प्रवृत्ती आणि माज असा स्थायी भाव असलेल्या शेजारच्या बीड जिल्ह्यातून लातूरमध्ये अनेकजण आपला बस्तान बसवता आहेत.त्यात लातुरात कांही डॉक्टर देखील आहेत,ज्यांनी अक्षरशः क्लीनिक पासून सुरवात केली,आणि आज त्यांच्या शहरात बहुमजली इमारती आहेत,शहराच्या लगत करोडोंच्या मालमत्ता आहेत.अर्थात त्यांचा उद्देश सेवा हा कधीच नव्हता, फक्त मेवा होता हे जगजाहीर आहे.असे असताना ज्यावेळी डॉक्टर घुगे यांच्या हलगर्जीपणा मुळे एक रुग्ण 2022 मध्ये दगावला, त्यावेळी डॉक्टर घुगे यांनी आपण खूप धुतल्या तांदळासारखे असल्याप्रमाणे आणि आपण रुग्णांचे मासिहा आहोत असे एक चित्र भाड्याचे कांही लातुरातील तथाकथित व्हाट्सअप्प युनिव्हर्सिटीचे कार्यकर्ते यांच्याकडून उदात्तीकरण करून घेतले,आणि आपण लातूर सोडून सोलापूरला जातोय अशी घोषणा केली.आणि लातूरच्या जनतेने उपचार घेण्यासाठी सोलापूरला यावे असे आव्हान देखोल केले,मग माशी शिंकली कोठे ? तर सोलापूरला नंगानाच केला की ठयाके बसतेत आणी जशी मनमानी लातूरला करता येते तशी सोलापूरला शक्य नाही याची पुरेपूर खात्री असल्याने फक्त डॉक्टर घुगे यांनी 2022 मध्ये भावनिक वातावरण तयार करत भाड्याच्या लोकामार्फत स्वतःचे उदात्तीकरण करून घेतले, त्यांना फक्त वेळ मारून न्यायची होती. आणि आपला उद्देश सफल करून घ्यायचा होता,तो झाला असेच आज तरी म्हणता येईल.


0 टिप्पण्या