हज़रत बंदगीमियाँ सय्यद शाह आलम र.अ.यांचा उर्स पीर-ओ-मुर्शीदच्या उपस्थितीत साजरा.

हज़रत बंदगीमियाँ सय्यद शाह आलम र.अ.यांचा उर्स पीर-ओ-मुर्शीदच्या उपस्थितीत साजरा. 

बीड जिल्हा प्रतिनिधी :- शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या जमाअ्त ए महेदवीया दरगाह दायरा येथील दरगाह हज़रत बंदगीमियाँ सय्यद शाह आलम बनी इस्राइल फ़ानी फ़िल्लाह बाक़ी बिल्लाह रहमतुल्ला अलैह यांचा ३९५ वा उर्स मुबारक पीर-ओ-मुर्शीदच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ११ एप्रिल २०२३ मंगळवार रोजी मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला. खास उर्ससाठी हैदराबादहून हज़रत रौशनमियाँ तर अमरावतीहून हज़रत तहेसीनमियाँ या दोन्ही पीर-ओ-मुर्शीद यांची उपस्थिती लाभली होती. यांच्या सोबतच औसा येथून मन्नान मुँगले, पुणे येथून चाँदपाशा लंगडे आणि सहकारी, औरंगाबादहून मुहम्मद मुश्ताक़, दौलताबादहून सादेखभाई आणि मुर्शीदीन सोबत अनेक मुरीदीन ही आले होते. देशभरातील अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने आले होते. याशिवाय परवेज़ मुहम्मद, अखील मुहम्मद, नज़ीर मुहम्मद, मुहम्मद आरेफ़, अरशद मुहम्मद, शेख वासेख, शेख लईख, शेख नुबैद, शेख यमन या स्थानिकांची ही उपस्थिती होती. उर्ससाठी आलेले मुर्शीदिन आणि सादेखभाई यांनी हज़रत बंदगीमियाँ सय्यद शाह आलम यांच्या विषयी बरीच माहिती दिली. ती सर्व मुरिदीननी लक्षपूर्वक ऐकली. यानंतर मुर्शीदीन आणि मूरिदीननी मिळून हज़रत बंदगीमियाँ शाह आलम यांच्या मजार वर गुलाब पुष्प अर्पण करून दरूद फातिहा चे पठण केले. अशाप्रकारे जमाअत ए महेदवीया ने मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात सकाळी ०७:०० ते  संध्याकाळी ०७:०० वाजेपर्यंत उर्स साजरा करण्यात आला. असे जमाअत ए महेदवीया दरगाह दायरा कमेटी, बीडचे सचिव तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या