महसूलची परवानगी न घेता खोदला शिवरस्तागंगाखेड उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार

महसूलची परवानगी न घेता खोदला शिवरस्ता
गंगाखेड उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार

पालम तालुका प्रतिनिधी :- महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता नाव्हा व चाटोरी, या दोन गावांना जोडणारा शिवरस्ता एका शेतकऱ्याकडून खोदण्यात आला. 
त्याची तक्रार शेतकऱ्यांनी गंगाखेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सोमवारी करण्यात आली.  त्यानंतर पालम तहसीलदारांना देखील निवेदन सादर करण्यात आले.
चाटोरी येथील वैजनाथ पुरभाजी इंदोरे व नागराबाई देविदास कडबे यांनी तक्रार केली. त्यांचे शेत नाव्हा शिवारात चाटोरी शिवररस्त्यालगत असून बालासाहेब मोतीराम किरडे यांनी जेसीबीच्या साह्याने सदर शिवरस्ता खोदला. त्यांनी कुठलीही परवानगी न घेता जेसीबीच्या साह्याने १७ फूट खोल आणि १५ फूट लांब असा ५०० मीटर अंतराचा रस्ता खोदला. त्याची माती किरडे यांनी स्वतःच्या शेतात टाकली. वास्तविक दोन्ही बाजूने माती टाकली असती तर शिवरस्त्यावर पाणी आले नसते. आता पावसाळ्यात शिवरस्ता खासून जाण्याची शक्यता देखील आहे. तसेच सदर रस्त्याचे मोजमाप देखील केले नव्हते. त्यामुळे सदर खोदकाम पूर्णतः अवैध असून त्याची विचारपूस केली असता श्री किरडे यांनी अरेरावीची भाषा करून शिवीगाळ केली. त्यामुळे शिवारातील ओढ्याचे पाणी तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेतात आणून सोडले. परिणामी, आगामी पावसाळ्यात तक्रारदारांच्या शेत जलमय होणार आहे. त्यामुळे या खोदकामाची दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या