कोतवाल कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष शिवप्रसाद देवने यांचा सत्कार
पालम तालुका प्रतिनिधी ःः- महाराष्ट्र राज्य कोतवाल कर्मचारी संघटनेच्या वतीने पालम शहरातील गजानंद मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता.6) कार्यक्रम घेण्यात आला. त्यात कोतवाल संघटनेचे राज्यध्यक्ष शिवप्रसाद देवणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी कोतवालांच्या मानधन वाढीसाठी पुढाकार घेतल्याने गंगाखेड, पालम व पुर्णा तालुक्याच्या वतीने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे गंगाखेड तालुकाध्यक्ष संतोष रानगीरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नामदेव कळसाईतकर, भागवत तलवारे, प्रकाश कांबळे, नारायण बीडगर, साईनाथ दाढे, शेखर कार्ले, लक्ष्मण शिनगारे, मोरे उपस्थित होते. नुकतेच कोतवालांच्या मानधनात दुप्पटीने वाढ झाली. त्यासाठी संघनेने लढा उभारला होता. त्याचे नेतृत्व शिवप्रसाद देवणे यांनी केले होते. त्यांच्या मागणीला यश आल्याने गंगाखेड, पालम व पुर्णा संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पालम तालुकाध्यक्ष महीपती कांबळे, माधव कांबळे, लक्ष्मण जाधव, संजय चव्हाण, केरबा आष्टुरकर, त्रिवेणी गायकवाड, संध्या कांबळे, सुरेखा मोरताटे यांनी परिश्रम घेतले.
फोटोओळी ः पालम शहरातील गजानंद मंगल कार्यालयात कोतवाल संघटनेचे राज्यध्यक्ष शिवप्रसाद देवणे यांचा सत्कार करताना संतोष रानगीरे, महीपती कांबळे, माधव कांबळे, लक्ष्मण जाधव, संजय चव्हाण, केरबा आष्टुरकर, त्रिवेणी गायकवाड, संध्या कांबळे, सुरेखा मोरताटे यांच्यासह आदी उपस्थित होते.

0 टिप्पण्या