अखेर शिक्षकांच्या प्रयत्नाला यश, सांस्कृतिक कार्यक्रमातून मिळालेल्या पैशातून पाडला शाळेत बोर.
पालम तालुका प्रतिनिधी :- पालम पासून आठ किलोमीटर असणाऱ्या छोट्याशा गावातील, कै. काळबाजी बापूजी पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी,अखेर विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून,26 जानेवारी च्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षीसातून, बोरवेल घेऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येश संपादन केले.
रवींद्रनाथ टागोर यांनी निसर्गाच्या रम्य सानिध्यात, ज्याप्रमाणे शांती निकेतन शाळा चालवून निसर्ग आणि शिक्षण यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून, जीवनात जगण्याचे कौशल्य शिकवले, त्याच धर्तीवर पालम तालुक्यातील, छोट्याशा खेड्यातील सामाजिक कार्यकर्ते,मारोतराव बाजगीर साहेब यांनी,श्री संत ज्ञानेश्वर माऊली शिक्षण प्रसारक मंडळ,या संस्थेच्या अंतर्गत मौजे तांबुळगाव येथे,काळबाजी बापूजी पाटील माध्यमिक विद्यालय स्थापन करून,पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था केली. याच शाळेवर असणाऱ्या शिक्षकांनी,आटोकाट प्रयत्न करून,या शाळेला गुणवंत विद्यार्थ्यी तयार केले,
परंतु शाळा ही गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असल्याने, पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती, पिण्याचे पाणी दूर वरून आणावे लागत होते,हा महत्त्वाचा विषय लक्षात घेऊन,मुख्याध्यापक अक्रम शेख सर यांनी,आपल्या शिक्षण वृंदाच्या विचाराने,26 जानेवारी 2023 साठी,घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात मिळणाऱ्या बक्षीसातून, बोरवेल घेऊन पाण्याची व्यवस्था करण्याचा विचार केला,आणि खरोखरच!बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीचा,या ठिकाणी प्रत्यय आला,
त्याच बोरचे उद्घाटन करण्यासाठी तांबुळगावचे माजी सरपंच अनिल कोंडीबा उंदरे, यांच्या हस्ते उद्घाटन करून बोरची मशीन चालू केली, तीनशे विस फूट बोर घेतला असता 2.5 इतके पाणी लागले,खरोखरच कै.काळबाजी बापूजी पाटील माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांच्या, परिश्रमाचा व प्रयत्नाचा आदर्श घेण्यासारखे कार्य आहे,हे नक्कीच मान्य करावे लागेल,असे परिसरातून चर्चिल्या जात आहे.सर्व स्तरातून शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले जाते.
यावेळी, मुख्याध्यापक अक्रम शेख, प्राध्यापक गजानन हुलगीर,अरूण बोईनवाड,गाडे सर,पैके सर,बाबर सर, भूजंग गायकवाड, उमर भैय्या, इत्यादी शिक्षक वृंद,व पालक उपस्थित होते.

0 टिप्पण्या