महापुरुषांची साखळी पद्धतीने बदनामी करण्याचे षडयंत्र :- प्रदेशाध्यक्ष व्याख्याते विनोदअण्णा भोसले पोलीस हक्क संरक्षक संघटना

 महापुरुषांची साखळी पद्धतीने बदनामी करण्याचे षडयंत्र :- प्रदेशाध्यक्ष व्याख्याते विनोदअण्णा भोसले पोलीस हक्क संरक्षक संघटना





जिल्हा प्रतिनिधी साहेबराव भंडे :- राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब,छ्त्रपती शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, राष्ट्रपिता जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर,छ.शाहू महाराज,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे आमचे प्रेरणास्थान व दैवत आहेत.या क्रांतिकारक महापुरुष व महानाईकामुळे हा महाराष्ट्र ओळखला जातो. याचा विसर सुपारिखोराना पडलेला दिसतोय.

 या महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत निवडणुकीत EVM मशीनचा (घोटाळा) वापर करून  निवडून आलेले सुपारीखोर राज्यपाल,खासदार,मंत्री व आमदार सारख्या जवाबदार लोकप्रतिनिधी कडून आमचे आराध्दैवत असलेल्या महापुरुषांचा महाराष्ट्रात वारंवार अवमान केला जातो.

पक्षाचे सर्वेसर्वा नेतृत्व समजले जाणारे RSS चे सुपारिखोर नेते या वक्तव्याला सारवा-सारवी करत एकप्रकारचे समर्थन करताना दिसत आहेत.

आपल्या पक्षाचे राज्यपाल,खासदार, मंत्री,आमदार व लोकप्रतिनिधी काय बोलतात. त्याचे समाजामध्ये काय परिणाम होतील याचा विचार पक्षश्रेष्ठीनी  करायला हवा.

भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी त्याचा केन्द्र बिंदू आहे. त्या शेतकरी बांधवा बद्दल केंद्रीय मंत्री पदावर असलेले मंत्री महोदय म्हणतात की  *साल्याना* एवढे दिले तरी रडतात अशी शिवी शेतकरी बांधवांना देतात.

या देशाची ज्यांनी घटना लिहिली. स्वातंत्र्य समता बंधुता प्रस्थापित केली.सर्वसामान्य नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला. तुम्हा आम्हाला शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला. अशा महापुरुषांना तूम्ही *भिकारी* म्हणता.याचा अर्थ काय....? जाणीवपूर्वक असले वक्त्यव्ये करायचे आणि समाजा समाजामध्ये द्वेषाचे राजकारण पसरून अशांतता निर्माण करायची.

तुम्हाला पेशव्यांचे राज्य निर्माण करायचे  असेल तर बिनधास्त करा पण पेशवाई ज्या पद्धतीने *लयास* गेली याचा अभ्यास देखील करायला विसरू नका. 

तुम्हाला सत्तेचा माज आलेला आहे. यात तीळ मात्रा शंका नाही.

पण खरच तुमच्यात  हिम्मत असेल तर 2024 ची निवडणूक  *EVM मशीन* हटवून बँलेंट पेपर वर घेवुन दाखवा.

जनतेच्या हितासाठी घेण्यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रीत न करता महापुरुषा बद्दल चुकीचे वक्तव्य करून आणि सीमावादाचा मुद्दा जाणीव पूर्वक उकरून जनतेला दिशाभूल करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

शिवप्रतिष्ठानचा मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे म्हणतो की, आपल्या बागेतील आंबा खाल्याने अनेक दाम्पत्यांना पुत्र प्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला होता.ही एकप्रकारची अंधश्रद्धा नव्हें का...?

एवढ्यावर न थांबता 

पुण्यात जंगली महाराज मंदिरात आपल्या धारकऱ्याना  संबोधित करताना म्हणाले की जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पेक्षा मनू श्रेष्ठ होता असे वादग्रस्त वक्तव्य केले आहेत.

हा महाराष्ट्र छ्त्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पकड जातीच्या तरूण मावळ्याना एकत्र करून उभा केलेला आहे. म्हणुनच छ्त्रपती शिवाजी महाराज हे सर्व बहुजन समाजाचे आराध्यदैवत आहेत.

ज्या दिवशी तुमचा खरा चेहरा या महाराष्ट्रातील शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगर आणि बुद्धिजीवी मतदारांना कळेल त्या दिवशी तुमच्या सत्तेच्या *ठींगाऱ्या* उडाल्या शिवाय रहाणार नाही याची जाणीव पण  असूद्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या