जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागेवर उमेदवार उभे करून विजयाचा झेंडा फडकू :- शिवाजीराव दिवटे
पालम (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य माणसाच्या हिताचे धोरण राबवत आहे, जनतेला पक्षाबद्दल विश्वास असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागेवर उमेदवार उभे करून विजयाचा झेंडा फडकू असा ठाम विश्वास भाजपाचे पालम तालुका अध्यक्ष शिवाजी दिवटे यांनी कार्यकर्तेच्या बैठकीत व्यक्त केले.
पालम तालुका भाजप शाखेच्या वतीने आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक संदर्भात पेठशिवणी येथील कार्यकर्त्यांचीबैठक दि.26 जुलै मंगळवार रोजी घेण्यात आली.
या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपाचे पालम तालुका अध्यक्ष शिवाजीराव दिवटे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या हिताचे विकासाचे धोरण राबवित आहेत. महाराष्ट्रातील पक्षाचे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचीही विकास कामाबद्दल दूरदृष्टी आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी राज्यात जनतेच्या हिताचे व विकासाचे निर्णय हाती घेतलेले आहेत. पालम तालुक्यातील जनतेला भाजपावर विश्वास आहे, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागेवर उमेदवार उभे करून विजयाचा झेंडा फडकू असा ठाम यावेळी बोलताना व्यक्त केला.
या बैठकीला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लिंबाजी टोले, तालुका सरचिटणीस भगवान करंजे, सोपान कराळे , रुपेश शिनगारे, साईनाथ करंजे, रमेश शिंनगारे, दत्त राव गौरकर, बालाजी बर्डे, तुकाराम कराळे, नागोराव कराळे,अनंता कराळे, गोविंद कराळे, विष्णू दिवटे,ज्ञानू कराळे, बालाजी ढगे, गोविंदराव लोखंई, यादवराव दिवटे, सुजीत मालेवार, मनमत सोनटक्के, गोविंद इंगळे, गोपीनाथ शिनगारे, शिवाजी पालमकर , विठ्ठल करंजे, राजेश्वर करंजे, विनायक गायकवाड, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या