संततधार पावसाने नद्यांना पुर, दळणवळणाचा संपर्क तुटल्याने 14 गावांचे जनजीवन विस्कळीत.

 संततधार पावसाने नद्यांना पुर, दळणवळणाचा संपर्क तुटल्याने 14 गावांचे जनजीवन विस्कळीत.


पालम प्रतिनिधी  :- शहरासह तालुक्यात पावसाने मागील तिन दिवसापासून चांगलेच मनावर घेतलेले दिसत असून या आठवड्यात दररोज सलग पाऊस पडत आहे.काल शुक्रवारी दिवसभर रिमझिम असतानाच रात्रभर पावसाचा जोर वाढून शनिवारी दुपारपर्यंत संततधार 

पाऊस पडल्यामुळे  तालुक्यातील लहान मोठ्या सर्वच नद्या पात्र सोडून वाहत आहेत. परिणामी तालुक्यातील 14 गावांचा पालम शहराशी संपर्क तुटलेला आहे.शहराजवळुन वाहणारी लेंडी नदी पात्र सोडून वाहत असून आजूबाजूच्या शेतात पाणी घुसले आहे. लेंडी नदीवरील पुयणी येथील पुलावरून शुक्रवार व शनिवारीही पाणी वाहत असल्याने पुयणीसह

आडगाव, तेळजापूर, खडी, वनभुजवाडी, गणेशवाडी आदी गावांचा पालमशी संपर्क तुटलेलाच आहे. दुसरीकडे यास नदीवरील पालम शेजारच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे याचा फटका आरखेड, सोमेश्वर,घोडा, फळा हे गाव संपर्काबाहेर गेले आहेत. तसेच शिरपूर ते सायळा दरम्यान गळाटी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे  सायळा ,उमरथडी, कुरलेवाडी, धनेवाडी आदी गावांचा संपर्क पालम शहराशी तुटलेला आहे.

     शनिवारी पालममधे आठवडी बाजार भरतो त्यात वरील 14 गावातील शेतकरी आपला शेतमाल तसेच दुध इत्यादी वस्तु पालम पर्यंत पोहोंचवू शकत नसल्याने त्यांना या कमी उंचीच्या पुलाचा फटका बसत आहे.

       सततच्या पावसाने तालुक्यातील बनवस  येथील सुशिलाबाई ज्ञानोबा टाळकुटे यांच्या घराची भिंत शनिवारी पहाटे कोसळली सुदैवाने त्यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.परंतु संसार उपयोगी साहित्य व शेतमाल भिजून खराब झाला आहे. पावसाचे पाणी घरात साचल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या