जान जाए पर ईमान न जाए या उक्तीप्रमाणे लातूरच्या सय्यद सादीक यांनी बजावले कर्तव्य

 जान जाए पर ईमान न जाए या उक्तीप्रमाणे लातूरच्या सय्यद सादीक यांनी बजावले कर्तव्य

 लातूर प्रतिनिधी अहेमद तांबोळी 

लातूरमध्ये महानगरपालिका चे सफाई कर्मचारी बबन काळे हे सकाळी यांच्या दुसऱ्या साथीदारासोबत साई नाका येथे सफाई करत असताना १५हजार रुपयांचा ओपो कंपनीचा मोबाइल खिशातून वगळून पडला. काही वेळानंतर सय्यद सादिक भाई हे कामाला जात असताना त्यांना तो मोबाईल सापडला

 आणि त्यांनी मोबाईल घेऊन त्यांच्या कामावर आले सादिक भाई यांनी आपली इमानदारी राखत मोबाईल स्विच ऑफ केला नाही काही वेळानंतर सफाई कर्मचारी बबन काळे यांचा फोन आल्यानंतर त्यांना बोलावून घेतले व त्यांना त्यांचा मोबाईल परत केला 

बबनराव काळे यांनी अगदी मनापासून. सादिक भाई यांचे आभार व्यक्त केले या जगामध्ये अजूनही इमानदारी बाकी आहे असे बोलत बबनराव काळे यांनी आपला मोबाईल स्वीकारला. सादिक भाई हे मूळ रेणापूर येथील आहेत मागील वीस वर्षापासून ते लातूर येथे मिस्त्री म्हणून काम करत आहेत सादिक भाई यांना तुम्ही मोबाइल परत का केला असे विचारल्यानंतर ते म्हणाले. 

हा मोबाईल काय माझ्या जिंदगीला जाणार नाही मात्र ज्यांचा मोबाईल हरपला आहे कदाचित तो व्यक्ती मात्र खूप त्रस्त होणार होता. मी सुद्धा एक मिस्त्री काम करतो म्हणून मला या गोष्टीची जाणीव आहे अशी विचारधारा व्यक्त करत सादिक भाई यांनी बबन काळे यांना मोबाईल परत केला व ही मिसाल कायम केली जान जाये पर इमान न जाये, याप्रसंगी बांधकाम कॉन्ट्रॅक्टर शेखअफजल भाई पत्रकार अहमद तांबोळी व सफाई कर्मचारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या