गेल्या कांही वर्षाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोट बंदी करून लोकाला आर्थिक कचाट्यात खेचले होते तर आता केंद्र सरकारसह राज्य सरकार कोरोना महामारीच्या नावाखाली लोकांना वेठीस धरत असल्याचे त्यांच्या निर्णया वरून कळत असून तब्बल दोन ते तीन महिन्यापासून राज्यात राज्य परिवहन मांडळाच्या बसेस वाहक व चालक बेमुदत संपावर गेल्यामुळे राज्यातल्या बसेस बंद आहेत जनतेला व ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असला तरी एसटी कर्मचाऱ्याना अद्याप न्याय मिळाला नाही व बसेच चालू नसल्यामुळे राज्यातल्या जनतेची मोठया प्रमाणात गैरसोय होताना ही आघाडी सरकार लक्ष देण्यास तयार नाही प्रशासन जनतेचा व एसटी कर्मचाऱ्याचा अंत पाहतो की काय असा प्रश्न जनतेला पडला आहे
राज्यातले आघाडी सरकार असे बनले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष असे तीन पक्ष मिळून सरकार बनले असून राष्ट्रीयनेते तथा राष्ट्रवादीकाँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण या राजकारणातील राज्यकर्त्याच्या निर्णयाला जनता चांगलीच वैतागली असल्यामुळे राज्यात आंबट कडीला पुन्हा उत्त आला

0 टिप्पण्या