जिल्ह्यात नगरपंचायतच्या निवडणूका असल्यामुळे जिल्हाधिकासह मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळा पुढे ढकल्या ? ग्रामीण भागातील शिक्षणाचा खेळखंडोबा पालकात संताप

 .जिल्ह्यात नगरपंचायतच्या निवडणूका असल्यामुळे जिल्हाधिकासह मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळा पुढे ढकल्या ? ग्रामीण भागातील शिक्षणाचा खेळखंडोबा पालकात संताप 

नायगाव रुई प्रतिनिधी माधव पवार 

नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात गेल्या दोन ते पावणे दोन वर्षापासून शिक्षण विभागाचा खेळखंडोबा झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असताना दिसून येत असताना सुद्धा  जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यासह जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर यांच्या बेजबाबदार पणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाच्या बाबतीत वाटोळे झाले असून जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनवार यांनी मोठ्या थाटाने १ डिसेंबर २०२१ रोजी पहिली ते ते चौथी पर्यंतच्या शाळा उघडणार असल्याचा गाजावाजा केल्याने पालकात समाधान वाटले होते परंतु जिल्ह्यधिकाऱ्यानी नवीन आदेश काढून शाळा पुढे ढकल्याने विध्यार्थाच्या पालकात संताप व्यक्त केला जातं आहे

राज्यातल्या राज्य कर्त्यांनी दोन ते पावणेदोन वर्षांपासून करोना महामारीच्या नावाखाली शिक्षणाचा वणवा पेटविला असताना सुद्धा बेजबाबदार अधिकाऱ्यानी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देत नसल्याने नूतन विद्यार्थ्यांची पिढी साक्षरा होण्या ऐवजी निरक्षर बनणार की काय..? असी भीती विद्यार्थ्यांच्या पालकांसह जनसामान्य माणसाला निर्माण झाली असून ह्या महत्त्वपूर्ण बाबीकडे जिल्हा प्रशासन कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याचे जनतेतून बोलल्या जातं असले तरी सदरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक डिसेंबर रोजी शाळा चालू करण्या ऐवजी ओमोक्रोनच्या लाठेसाजे कारण समोर करूनजिल्ह्याधिकाऱ्यानी जिल्ह्यातील शाळा १३ डिसेंबर रोजी चालू करण्यात येतील असा आदेश जारी केला आहे

प्रशासनाने ओमोक्रोनच्या लाठेचा धोका पुढे करून ग्रामीण भागातील शाळा तेरा दिवस पुढे लांबविले असूम  खरे तर जिल्ह्यासह राज्यात नगरपंचायतच्या निवडणुका असल्याने निवडणुकीतील प्रशासकीय यंत्रना निवडणुकीच्या काम काजासंदर्भात शाळेवरील शिक्षका विना अडचण भासू नये म्हणून जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी तेरा दिवस पुढे शाळा ढकल्यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाचे तीन-तेरा वाजत असल्याचे ही दिवून येत असून जिल्ह्याधिकाऱ्यानी असी शक्कल लढविली असल्याचे पालकासह जनतेतून बोलल्या जात असून अगोदरच गेल्या दोन ते पावणेदोन वर्षांपासून शिक्षण विभागात आंधळ दळत कुत्रपिठ खातोय अशी गत निर्माण झाली असली तरी आंधळ्याची वरात भैऱ्याच्या घरात या म्हणीप्रमाणे जनतेला म्हण्याची वेळ आली असल्याचे जनतेतुन बोलल्या जात असले तरी जिल्हा प्रशासनाने चांगलीच शक्कल लढविली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या