अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ ; सरकार कडून मदतीची अपेक्षा राजेश शिंदे (उपसरपंच) पेठ पिंपळगाव

 अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ ; सरकार कडून मदतीची अपेक्षा  राजेश शिंदे  (उपसरपंच) पेठ पिंपळगाव 


पालम तालुका प्रतिनिधी ; अवधूत जाधव


 सततच्या पावसाने मागील आठवड्याभरापासून पालम तालुक्यात थैमान घातले या पावसाने खरीप पिके अक्षरशः उध्वस्त झाली


.हाती आलेले पीक गेल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवणार असून  पालम तालुका दुष्काळ ग्रस्थ म्हणून जाहीर करावा अशी मागणी अपेक्षा राजेश शिंदे उपसरपंच पेठ पिंपळगाव यांच्या कडून   होत आहे.




पालम पासुन ३ कि. मी. अंतरावर असणारे पेठ पिंपळगाव   येथील सोयाबीन कापण्याची गरज पडणार नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली दिसून येत आहे खरीपाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला त्यानंतर जुलै महिन्यापासून पावसाचा खंड पडलापरंतु शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून योग्य ते नियोजन करीत आपली पिकी वाचवली होती मात्र त्यानंतर आगस्ट महिन्यामध्ये पावसाने सतत धार लावून धरल्याने मोठ्या प्रमाणावर पेठ पिंपळगाव येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन तूर मूग उडीद कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे


पिकांची पाने पिवळी पडून सडून गळून पडली आहेत काही दिवसापूर्वी झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली आशा मावळली आहे


शेतकऱ्यांना सोयाबीन काढण्याची गरज सुद्धा नाही 


त्यामुळे मजुरांवर व शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी पेठ पिंपळगाव येथील राष्ट्रवादीचे युवा नेते राजेश सुदामराव शिंदे उपसरपंच यांच्याकडून होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या