माजलगाव शहरातील अतिक्रमणावर नगर परिषदेची धडाकेबाज कार्यवाही मेनरोड वरील अतिक्रमण काढल्याने घेतला मोकळा श्वास

 माजलगाव शहरातील अतिक्रमणावर नगर परिषदेची धडाकेबाज कार्यवाही

मेनरोड वरील अतिक्रमण काढल्याने घेतला मोकळा श्वास


माजलगाव प्रतिनिधी मुस्ताक कुरेशी


 नगर परिषद प्रशासनाने पोलीस सरंक्षणात मेन रोडवरील पोस्ट ऑफीस समोरचे गेल्या आठवड्यात अतिक्रमणे हटविली होती. दरम्यान याच मेनरोड वरील मंगळवार दि.१ रोजी नगर परिषदेने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. यामुळे सदरील रोडने मोकळा शॉस घेतला असून अतिक्रमणाच्या विरोधात ही कार्यवाही चालुच ठेवावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे.


शहरातील मेन रोडवर पोस्ट ऑफीस ला

जाणारा रस्ता हा अनेक दिवसा पासून अतिक्रमनाने घेरले होते. त्यात नगर परिषदेच्या नुतन ईमारतीचे याच रोडवर

उद्घाटन झाल्याने या रोडवर वर्दळ वाढली असतांना अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत जाऊन मेन रोड वरुन येजा करण्यास ही आडचण निर्मान होत होती गावठाणातील रोड अगोदरच अरुंद व त्यात अतिक्रमण व रोडवरील गाड्यावरुन भाजीपाला विक्री करणारे हात गाड्या वाले यामुळे नेहमी या रोडवर ट्रॉफीक जाम होते. कारण या रस्त्यावर पोस्ट ऑफीस, स्टेट बँक असल्याने या रस्त्यावर येजा करणारीची ही संख्या जास्त आहे. त्यामुळे नागरीकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. तर अनेक वेळा हातगाड्यावाले व पादचारी यांच्यात वाद विवादाची स्थिती निर्मान होत होती. यामुळे नगर परिषद प्रशासनाने गुरुवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हाटवित या रोडचा श्वास मोकळा केला त्यामुळे येथील रहदारीही सुरुळीत झाली असून नागरीकातुन समाधान व्यक्त केले जात आहे. ही कारवाई मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.कार्यालयीन अधिक्षक गणेश डोंगरे, कर्मचारी , प्रकाश शिंदे, शेख बाबर, शेख बाबा, सह पोलीस कर्मचारी बाळासाहेब आनवणे, चालक श्रीमंत पवार, पो.ना. बाबुराव पवार सह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाई मुळे पोलीसासह न.प. कर्मचाऱ्यांचे नागरीकातुन आभार व्यक्त केले जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या