गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष ,लाडके आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे काका यांनी महावितरण ला दिला इशारा!

 गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष ,लाडके आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे काका यांनी महावितरण ला दिला इशारा!


 

 पालम तालुक्यातील वीजेचा प्रश्‍न सोडवा अन्यथा आंदोलनं करू.

 पालम प्रतिनिधी :- पालम तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची पिकं वीजेअभावी जळून जात आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्या जात आहे. वीज वितरण कंपनीने शेतकर्‍यांना नियमित व दिवसा वीज पुरवठा करणे आवश्यक आहे मात्र सध्या पालमच्या ग्रामीण भागात 48 तासातून केवळ 6 तासच वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.पालम तालुक्यातील ग्रामीण भागात किमान 12 तास सुरळीत वीज पुरवठा करावा अन्यथा येत्या आठ दिवसात मोठे जनआंदोलन उभारु असा इशारा आज गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष, लाडके आमदार डॉ रत्नाकररावजी गुट्टे काका यांनी वीज वितरणच्या अधिकार्‍यांना दिला आहे.* 

 *पालम तालुक्यातील वीज प्रश्‍नावर आज राष्ट्रीय समाज पक्ष आणि आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांची भेट घेवून  ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्‍न त्यांच्या समोर मांडला. सध्या ग्रामीण भागात 48 तासातून केवळ 6 तासच वीज वीज पुरवठा होतो. त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांना पाणी देने शक्य होत नाही. विहिरींना बोअरला पाणी असले तरी विजेअभावी ते पाणी पिकांना देता येत नाही. त्यामुळे पाण्याचा ताण पडून शेतकर्‍यांची पिके कोमेजू लागले आहेत. सध्या हरभरा, गव्हू आदी पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे मात्र पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे हे पिकं माना टाकत आहेत. या प्रश्‍नावर आज रासपचे नेते गणेशराव रोकडे दादा* , *आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे पालम प्रभारी माधवराव गायकवाड , तालुका अध्यक्ष बालासाहेब भाऊ रोकडे यांच्यासह अन्य पदाधिार्‍यांनी वीज वितरणच्या अधिकार्‍यांची भेट घेतली.व निवेदन दिले या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेनंतर आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे यांनी संबंधित अधिकार्‍यांशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला व* *ग्रामीण भागातील वीज पुरवठा तात्काळ सुरु करण्याचे त्यांनी सांगितले. यावरही ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास येत्या आठ दिवसात जनआंदोलन करण्याचा इशारा आमदार डॉ रत्नाकररावजी गुट्टे काका  यांनी दिला आहे.* प्रतिनिधी परभणी जिल्हा बाळासाहेब पाटील हिलाल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या