नको खिशाला पैशाचे ओझे, पे अ‍ॅण्ड स्कॅनच ओके खिशात पैसे ठेवायची कटकट नको.....

 नको खिशाला पैशाचे ओझे, पे अ‍ॅण्ड स्कॅनच ओके खिशात पैसे ठेवायची कटकट नको.....



मुनीर शाह बाजार सावंगी/खुलताबाद :- आता अनेक जण कॅशलेस व्यवहाराकडे वळताना दिसून येत आहेत. यात युवा वर्गाने.आघाडी घेतली असून ग्रामीण भाग सुद्धा यात एक पाऊल पुढे आहे. त्यामुळे सुटे पैसे नसणे, नोटा खराब असणे यातून निर्माण होणारे वादही कमी झाले आहेत.

आजरोजी शहरी भागासह खेडोपाडी चहावाले, किराणा दुकानदार, भाजीपाला, पानटपरी, आइस्क्रीम

जार पाणी वाले.दुकान, हातगाडीवर. व्यवसाय करणाऱ्यांसह छोट्या मोठ्या दुकानांत .कॅशलेस. व्यवहाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे सुट्या पैशांची समस्या सुटली असून नागरिक मोठ्या संख्येने या सेवेचा वापर करताना दिसत आहेत.

प्रत्येक विक्रेत्याकडे स्मार्ट पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली आहे. शिवाय घरात सगळ्यांकडे मोबाइलची सुविधा असल्याने वीजबिल, टेलिफोन बिल, तिकिटे,

अगोदर एटीएम मशीन नव्हते तेव्हा कॅश काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी तासनतास बँकेत उभे राहावे लागत होते. एटीएम आल्यानंतर तो त्रास काहीसा कमी झाला. मात्र, आता ऑनलाइन पेमेंट सुविधा आल्याने आर्थिक व्यवहार सुरळीत होत असून आमचा वेळ व मानसिक त्रास कमी झाला 

सिलिंडरचे बिल भरणे आदींसाठी स्मार्ट पेमेंटचाच वापर केला जात आहे.

दरम्यान आज ग्रामीण भागातील अनेकांकडे अँड्रॉइड मोबाइल नाहीत. त्यामुळे त्यांना नगदी पैसे देऊनच व्यवहार करावा लागतो. अनेकदा या प्रकारात चिल्लर पैशांसाठी हमरीतुमरीवर विषय वाढतो, वाद पण होतात. ज्यांच्याकडे मोबाईल नाही, किंवा ऑनलाइन पेमेंटची सुविधा वापरता येत नाही त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या