बाल व्याख्याती आरोही खंदारे पाटील हिचा बालकलाकार रुद्राक्ष आवटे पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

बाल व्याख्याती आरोही खंदारे पाटील हिचा बालकलाकार रुद्राक्ष आवटे पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

परभणी जिल्हा प्ररतिनिधी :- राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीनेभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धाडसी क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंती निमित्त  बाल व्याख्याती आरोही खंदारे पाटील यांनी सर्व महापुरुषांच्या जयंती निमित्त पुण्यतिथी निमित्त व इतर महोत्सवाच्या निमित्ताने तीस-पस्तीस व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्या भाषणाच्या कलेतून समाज प्रबोधन केल्याबद्दल त्यांचा फार पुष्पगुच्छ प्रतिमा देऊन सत्कार गौरव करण्यात आला 
बालकलाकार रुद्राक्ष आवटे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष नितीन देशमुख नीलवर्ण, क्रमाचे प्रमुख पाहुणे संभाजी ब्रिगेड पक्षाचे महानगर अध्यक्ष गजानन जोगदंड स्वप्निल गरुड गायकवाड कॉम्प्लेक्स च्या संचालक गायकवाड मॅडम, खंदारे सर कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्र जन फाउंडेशनचे अध्यक्ष प्राणिमित्र नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीने सत्कार स्वागत करण्यात आले काळी कमानी समोर मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसर वसमत रोड 24 ऑगस्ट रोजी सत्कार व स्वागत करण्यात आले प्रत्येकाने इतर महापुरुषांचा आदर्श घ्यावा व प्रत्येकाने आपला बालक बालिका व्याख्याते किंवा व्याख्यानकार किंवा प्रवचनकार कीर्तनकार करावे असा संदेश देण्यात आला अशी माहिती गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या