मा.श्री.अजित दादा पवार सोशल फाउंडेशन च्या युवाप्रदेश उपाध्यक्षपदी श्री रामेश्वर बचाटे पाटील यांची निवड

मा.श्री.अजित दादा पवार सोशल फाउंडेशन च्या युवाप्रदेश उपाध्यक्षपदी श्री रामेश्वर बचाटे पाटील यांची निवड

परभणी जिल्हा प्ररतिनिधी :- सोनपेठ तालुक्यातील वडगाव (स्टे.) येथील श्री. रामेश्वर बचाटे पाटील यांची मा.श्री.अजित दादा पवार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या युवक प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष श्री.पंकज तंतरपाळे यांनी नियुक्तीपत्र देऊन केली. 
सोशल फाउंडेशनच्या बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू असे श्री रामेश्वर बचाटे पाटील यांनी सांगितले. श्री रामेश्वर बचाटे पाटील यांची निवड युवक प्रदेश उपाध्यक्ष म्हणून झाल्यामुळे त्यांचे मा. श्री.धनंजय मुंडे साहेब कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य,श्री. राजेश  दादाविटेकर (माजी जि. प. अध्यक्ष),माजी आमदार विजयराव भांबळे साहेब,श्री. विठ्ठलराव सूर्यवंशी,श्री. दशरथराव सूर्यवंशी,श्री. अरुण काका डाके, श्री. बाळासाहेब बचाटे,श्री.कादरभाई गुळखांडकर,श्री.हनुमान कदम,श्री. वैजनाथराव सोळंके,श्री.राजेंद्र सोनी, श्री.रोहित भैय्या निरस,श्री.भाऊसाहेब मोरे,श्री. सदाशिव आप्पा कोलेकर,पत्रकार विटेकर,पाचंगे साहेब, श्री.शिवराज भाई जोगदंड,श्री.दीपक सोळंके,श्री.अशोकराव भोसले,श्री.दिगंबर उत्तम भुजबळ, श्री. शेषराव मोहनाजी सोपणे मामा,स्वराज कन्स्ट्रकशन पुणे,पोलीस कर्मचारी वर्ग, शिक्षक वर्ग, पत्रकार वर्ग, इत्यादी मान्यवरांनी त्यांचे भरभरून कौतुक केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या