मराठी शाळा टिकली पाहिजे आणि टिकवली पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी,श्री.रामेश्वर बचाटे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य

मराठी शाळा टिकली पाहिजे आणि टिकवली पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी,श्री.रामेश्वर बचाटे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य

 गंगाखेड तालुका प्रतिनिधी :- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वडगाव स्टे. ता. सोनपेठ जि. परभणी येथे दिनांक 20 जून 2023 रोजी जिल्हा अंतर्गत बदली मुळे उपस्थित झालेले उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री.तुकाराम सावंत साहेब ,शिक्षक श्री.श्रीधर सावंत सर ,श्री.कुंडलिक कांबळे सर व श्रीमती ढेले मॅडम यांचा स्वागत समारंभ शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री रामेश्वर बचाटे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस परभणी यांनी आयोजित केला होता. 
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री सावंत साहेब यांचे स्वागत शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.रामेश्वर बचाटे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस परभणी यांनी केले.श्री सावंत सर यांचे स्वागत पालक श्री अशोक बचाटे यांनी केले.श्री कांबळे सर यांचे स्वागत श्री.माधव बचाटे यांनी केले 
व श्रीमती ढेले मॅडम यांचे स्वागत शालेय व्यवस्थापन समिती सदस्या सौ. शकुंतला रामेश्वर बचाटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बेंबडे सर यांनी केले. 
शाळेमध्ये नव्याने रुजू झालेले शिक्षक श्री. कांबळे सर यांनी अनुभव कथन करताना आपला पूर्वीचा प्रवास सांगितला व येथून पुढेही सर्व विद्यार्थी व पालक यांना अपेक्षित अशा प्रकारचे कार्य करण्याचे वचन त्यांनी दिले व व शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी केलेल्या स्वागत सत्कराबद्दल त्यांनी आभार मानले.मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत मातृ भाषेतून शिक्षण हे सर्वोत्तम शिक्षण असते त्यातूनच माणसाचा सर्वांगीण विकास होतो असे त्यांनी सांगितले. अशाच प्रकारचे सहकार्य सर्व पालक गावकरी व शालेय व्यवस्थापन समितीने नेहमी करावे असे त्यांनी आपले मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री सावंत साहेब यांनी वडगाव जिल्हा परिषद शाळेची मुख्याध्यापक पदाची जबाबदारी चांगले व लोकापेक्षित काम करून पार पडण्याचा प्रयत्न करेन असे वचन सर्वांना दिले.मराठी शाळा टिकली पाहिजे आणि टिकवली पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी अशा सूचना आणि अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.यानंतर लागलीच इयत्ता पहिली प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. पहिली साठी प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांच्या अपेक्षित सर्व प्रकारच्या नोंदी कार्डवर घेण्यात आल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.या प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक श्री.सावंत साहेब,शिक्षक श्री. सावंत सर,श्री.कांबळे सर,श्री.म्हेत्रे सर, श्री.कदम सर, श्री.बेंबडे सर ,श्रीमती ढेले मॅडम ,शा.पो.आ. मदतनीस श्री. पारसनाथ सुरंजे,पालक रामेश्वर बचाटे,अशोक बचाटे,माधव बचाटे,रोकडोबा बचाटे,गणेश बचाटे,दत्ता बचाटे आदि पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या