केरवाडी पुलाजवळ येताच पुराचे पाणी पाहून असताना अचानक एसटी जाग्यावरच पडली बंद
संपादकीय वृत्त
श्रावण महिन्याचा शेवट आणि या महाराष्ट्रातील सांस्कृतिक उत्सवाच्या मुहूर्तावर, सर्वत्र बैलपोळ्याच्या उत्सवात तयारीत शेतकरी मित्र असतानाच, पावसाच्या सरींनी सुरुवात केली दिनांक 06/09/ 2021 पासून ते दिनांक 07/09 /2021 सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोधार पाऊस चालू असल्याने, नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले, त्यातच गंगाखेड लोहा रस्त्यावर असणाऱ्या केरवाडी येथील नदीला पूर आल्याने दुथडी भरून वाहत असल्याने, नदीला महासागराचे रूप निर्माण झालं होतं, पाणी पुलावरून जात असताना लोह्याकडून गंगाखेड कडे जाणारी एस टी बस जाग्यावरच थांबली,
यावेळी एसटीतील प्रवाशांनी पाण्यामध्ये फिरण्याचा आस्वाद घेतला. बऱ्याच काळानंतर या वर्षी मात्र वरुणराजाची मोठी कृपा झालेली दिसून येत आहे. नदीला महापूर आला अस चित्र अद्यापपर्यंत या नव्या पिढीला तरी काही कळत नसेल, परंतु या पावसामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांची पिके गेली, हातातोंडाशी आलेले पीक या निसर्गाच्या कोपामुळे नष्ट झालं, एवढंच काय परंतु अगोदरच कोरणा या महामारी मूळ सर्वत्र आर्थिक ताणतणाव निर्माण झाला असतानाच निसर्गाच्या या अतिवृष्टीच्या कोपामुळे शेतकरी मात्र हतबल झालेले दिसून येत आहे,
या वेळी अचानक बंद पडलेल्या एसटी बस मधील, प्रवाशांनी उतरून पाण्याचा आस्वाद घेत असतानाच चर्चा चालू होती,कोरोनामुळे तीन वर्षे लॉक डाऊन मध्ये गेले,आणि आता या अतिवृष्टीमुळे जे काय हातातोंडाशी आले तेही गमावले, पाहुया आता सरकार नेमकं पूरग्रस्तांसाठी काय योजना राबवतो ते, नाहीतर नाव पूरग्रस्त आणि गाव पुढाऱ्याच होतं का काय ? अशी चर्चा होत होती

0 टिप्पण्या